थोडक्यात गुन्हेवार्ता....

By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:36+5:302015-08-14T00:05:36+5:30

शनिवारी मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित

Briefly the crime .... | थोडक्यात गुन्हेवार्ता....

थोडक्यात गुन्हेवार्ता....

िवारी मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित
नागपूर : गिट्टीखदान, कोराडी आणि जरीपटका परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे.
१५ ऑगस्टचे औचित्य साधून पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार आहे. त्यासाठी गिट्टीखदान आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे.
---
पोलिसांना मारहाण
नागपूर : भांडण सोडविण्यास आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन आरोपी पळून गेले. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजता झाशी राणी चौकातील पेट्रोलपंपावर ही घटना घडली.
अब्दुल हैदर शेख हबीब (वय ५२) आणि नायक अनिल हे वाहतूक शाखेचे पोलीस पेट्रोलपंपावर भांडण करणाऱ्यांना समजाविण्यासाठी गेले असता तीन आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत पळ काढला. हैदर यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---
जवानाने लावला गळफास
नागपूर : सीआरपीएफचे जवान मनोज गणेशप्रसाद तिवारी (वय ४०) यांनी त्यांच्या सोनेगावातील शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १०.३० ला ही घटना उघडकीस आली. कामेश भवानीशंकर द्विवेदी (वय ४४, रा. गाडगेनगर, रमना मारोती) यांच्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
----

Web Title: Briefly the crime ....