संक्षिप्त बातम्या.....

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:27+5:302015-02-13T00:38:27+5:30

पीडित विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव

Brief news ..... | संक्षिप्त बातम्या.....

संक्षिप्त बातम्या.....

डित विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव
नागपूर : पुनर्मूल्यांकनाचा निकाल विलंबाने आल्यामुळे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळत नसल्याने रामटेक येथील किट्स महाविद्यालयातील विद्यार्थिनी रुचाली खोब्रागडेने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने महाविद्यालयाला नोटीस बजावून २३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्तीतर्फे रिचा तिवारी यांनी बाजू मांडली.
वासनकर घोटाळा, सुनावणी तहकूब
नागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री, सासू कुमुद जयंत चौधरी व भाऊ विनयची पत्नी मिथिला यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केले आहेत. आज, गुरुवारी अर्जावरील सुनावणी २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.
अंकित कन्स्ट्रक्शन, उत्तरासाठी वेळ
नागपूर : अंकित कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात आल्यामुळे कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार किशोर कन्हेरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज, गुरुवारी याचिकाकर्त्याने शासनाच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. कंपनीला २८ जुलै २०१४ पासून पुढील तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचा आदेश कायम
नागपूर : अमरावती येथील नगरसेवक भूषण बनसोड यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील विभागीय आयुक्तांचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने रद्द केला होता. आयोगाचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरविला आहे. तसेच आयोगाच्या निर्णयाविरुद्ध समाजसेवक राजू चौठमल यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

Web Title: Brief news .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.