उलटीचं कारण देत कार थांबवली; सासरी निघालेल्या नवविवाहितेची पुलावरून नदीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 07:08 IST2020-06-15T02:58:05+5:302020-06-15T07:08:00+5:30

कार चंबळ नदीवरील पाली पुलावर आल्यावर नवविवाहितेने चालकाला मला उलटी करायची असल्यामुळे थांबायला सांगितले.

Bride Jumped In Chambal River In Madhya Pradesh | उलटीचं कारण देत कार थांबवली; सासरी निघालेल्या नवविवाहितेची पुलावरून नदीत उडी

उलटीचं कारण देत कार थांबवली; सासरी निघालेल्या नवविवाहितेची पुलावरून नदीत उडी

शेओपूर (मध्यप्रदेश) : रात्री लग्न होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी रीतसर पाठवणी होऊन सासरी निघालेल्या विवाहितेने चंबळ नदीत पुलावरून उडी मारली. शेजारच्या राजस्थानमधील खेड्यात बिदाई समारंभ झाल्यानंतर अंदाजे ३० मिनिटांनी हा प्रकार रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला, असे पोलिसांनी सांगितले.

बिदाई समारंभानंतर नववधूसोबत तिचा पती आणि इतर लोक कारने शेओपूर जिल्ह्यातील सासर असलेल्या खेड्याकडे निघाले होते. कार चंबळ नदीवरील पाली पुलावर आल्यावर तिने चालकाला मला उलटी करायची असल्यामुळे थांबायला सांगितले. चालकाने कार न थांबवल्यामुळे तिने स्टीअरिंग व्हील ताब्यात घेतले व त्यानंतर चालकाला कार थांबवावीच लागली, असे पोलीस म्हणाले. तिचा पती व इतरांना काही समजायच्या आत ती कारमधून बाहेर आली आणि तिने पुलावरून उडी मारली. ती अजून सापडलेली नाही. शनिवारी रात्री तिचा विवाह झाला. मुलीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या तिच्या वडिलांनी लग्नात, तर सगळे काही व्यवस्थित होते, असे म्हटले.

Web Title: Bride Jumped In Chambal River In Madhya Pradesh