The bride goes to Pakistan to get married; But ... | विवाहिता लग्न करण्यास पाकिस्तानकडे निघते; पण...

विवाहिता लग्न करण्यास पाकिस्तानकडे निघते; पण...

चंदीगड : प्रेम अंधळे असते आणि त्याला कोणत्याही सीमा थांबवू शकत नाहीत, असे जे नेहमी ऐकायला येते, ते  ओदिशातील एक विवाहित महिला सिद्ध करायला गेली. परंतु, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांंनी तिला सीमेवरच थांबवले. ही महिला एका मुलीची आई असून ती लग्नाच्या उद्देशाने पाकिस्तानात जाण्यासाठी ओदिशातून पायी चालत पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील बाबा डेरा नानक येथे आली. सीमेवरील बीएसएफ जवानांनी तिला अडविले. तिच्याकडे पासपोर्टही नाही. डेरा बाबा नानक ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासात, या महिलेने स्वत:सोबत २५ तोळे सोने आणि ६० ग्रॅम चांदीचे दागिने आणले होते, हे स्पष्ट झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The bride goes to Pakistan to get married; But ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.