स्वत:च्या लग्नात वधूच नाचली

By Admin | Updated: January 5, 2017 02:50 IST2017-01-05T02:50:50+5:302017-01-05T02:50:50+5:30

लग्न समारंभ हे मनसोक्त नृत्य करण्याचे एक निमित्त असते. प्रत्यक्ष लग्नातील विधी, रुढी, परंपरांबरोबरच मनमुराद नृत्य करणे, थट्टामस्करी, खाण्यापिण्यामुळे लग्नसराईचा हंगाम

The bride danced in her wedding | स्वत:च्या लग्नात वधूच नाचली

स्वत:च्या लग्नात वधूच नाचली

नवी दिल्ली : लग्न समारंभ हे मनसोक्त नृत्य करण्याचे एक निमित्त असते. प्रत्यक्ष लग्नातील विधी, रुढी, परंपरांबरोबरच मनमुराद नृत्य करणे, थट्टामस्करी, खाण्यापिण्यामुळे लग्नसराईचा हंगाम हा खूपच उत्साहजनक ठरतो. त्यामुळे जिचे लग्न होणार आहे तिने स्वत: आपल्या भव्य वाटणाऱ्या लग्न समारंभात व वरातीत मन तृप्त होईपर्यंत नाचणे ही काही आता आश्चर्याने बघावी व चर्चा करावी अशी बाब राहिलेली नाही. परंतु या वधुने लेहंगा घालून केलेल्या हिप्पी हिप्पी नृत्याची फेसबुकवर खूप जोरदार चर्चा झाली.
तिच्या नृत्याचे दोन व्हिडिओज २० डिसेंबर रोजी अपलोड होताच त्यांनी धूम केली व त्याचा ११ दशलक्ष नेटिझन्सनी आनंद लुटला. ‘क्वीन’ चित्रपटात कंगना रानावतने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये लंडन ठुमकाच्या नृत्यासारखे या नवरीने नृत्य केले. दुसऱ्या व्हिडिओत ती कटरिना कैफ आणि सिद्धार्थ मलहोत्राच्या ‘बार बार देखो’तील ‘काला चष्मा’ नृत्य करताना दिसते. या व्हिडिओजना फेसबुकवर खूपच लाईक केले गेले. १.४ लाख शेअर्स आणि १८ हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया त्यांच्या वाट्याला आल्या. काय झकास एन्ट्री आहे, अशा शब्दांत एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली तर दुसऱ्याने ‘सुपर्ब एन्ट्री’, असे म्हटले.

Web Title: The bride danced in her wedding