शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचं नाव विसरला, होणाऱ्या नवरीनं मोडलं लग्न अन् दीरासोबतच थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:26 IST

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नवरदेवाला पंतप्रधानांचे नाव सांगता न आल्याने नवरीने लग्नास नकार दिल्याची घटना घडली. सैदपूर पोलीस स्टेशन परिसरातील नसीरपूर गावातील रहिवासी राम अवतार राम यांचा मुलगा शिवशंकरचे (२७) लग्न शेजारील गावातील रहिवासी लाखेडू राम यांची मुलगी रंजना हिच्यासोबत ठरले होते. पण मेव्हणीने लग्नाच्या दिवशी सकाळी नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले असता मुलाला ते सांगता आले नाही.  दरम्यान, मेव्हणीसह नवरीच्या मैत्रीणींनी आणखीही काही प्रश्न विचारले. पण नवऱ्या मुलाला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यानंतर संतापलेल्या नवरी मुलीने होणारा नवरा मंद असल्याचे समजून लग्नास नकार दिला. नंतर घरातल्यांच्या दबावानंतर नवरदेवाच्या लहान भावासोबत लग्न लावून देण्यात आले. लग्न लागल्यानंतर नवरी सासरला गेली. पण काही दिवसांनी मुलीला आणण्यासाठी मुलीचे नातेवाईक तिच्या घरी पोहोचले असता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. 

कमी वयाच्या मुलासोबत लग्न लावले - नवरदेवाचे वडीलनवरदेवाच्या वडिलांनी आरोप करताना म्हटले की, मुलीकडील मंडळीने माझा मोठा मुलगा शिवशंकर हा मंद असल्याचे कारण देत छोटा मुलगा अनंतसोबत लग्न लावून दिले. अनंतचे वय लग्नासाठी अद्याप कमी आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार मिळाली नव्हती. पण मुलीच्या तक्रारीवरून मुलाला पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापसात बोलून प्रकरण मिटवले आणि मुलाला सोडण्यात आले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस