शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वधूनं वॉशरूमला जाण्यासाठी पतीकडं मागितले 10 रुपये, गुपचूप बॉयफ्रेंडच्या बाईकवर बसली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:43 IST

Bride groom news : संबंधित नवविवाहिता वॉशरूमला जात असल्याचे सांगून गेली होती. पण ती बराच वेळ होऊनही न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. पण...

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर माँ विंध्यवासिनी मंदिरात दर्शनासाठी गेलेली वधू फरार झाल्याची घटना घडली आहे. संबंधित वधूच्या सासरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नवविवाहिता वॉशरूमला जात असल्याचे सांगून गेली होती. पण ती बराच वेळ होऊनही न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. यानंतर वधू, वराची आणि त्याच्या कुटुंबियांची फसवणूक करून प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. यासंदर्भात संबंधित वराने विंध्याचल पोलिसांकडे मदत मागितली होती. सासरच्यांना फसवून वधू फरार... -यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर, संबंधित वधू एका रस्त्यावरून लाल रंगाच्या बाईकवर बसून बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वधू उत्तर प्रदेशातील आजम गडची रहिवासी असून जौनपूर येथील एका तरुणासोबत तिचा विवाह झाला होता. महत्वाचे म्हणजे, हा विवाह याच महिन्यात 10 फेब्रुवारीला झाले होते. तसेच, सासरचे लोक दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 19 फेब्रुवारीला माँ विध्यवासिनीच्या दर्शनासाठी गेले होते. येथूनच वधू फरार झाली.

10 रुपये मागून गेली होती वॉशरूमला -संबंधित घटनेसंदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, कुटुंबातील लोक खाण-पाणात व्यस्त होते. याच वेळी संबंधित नववधूने आपल्या पतीकडे सुटे 10 रुपये मागीतले आणि वॉशरूमकडे गेली. यानंतर ती एकटीच मंदीर परिसरातून बाहेर आली. मात्र बराच उशीर होऊनही ती न परतल्याने सासरच्या लोकांनी तिची शोधाशोध सुरू केली, पण ती सापडली नाही. यानंतर, पोलिसांनी केलेल्या तपासातून, ती कुण्या तरुणासोबत बाईकवर बसून फरार झाल्याचे समोर आले. यासंदर्भात पोलिसांना कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार मिळालेली नाही. तक्रार दाखल झाल्यास पुढील कारवाई होईल. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश