शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Breaking : 'कोव्हिशिल्ड' लसीच्या भारतातील चाचण्या सुरुच राहणार; आदर पुनावाला यांची 'ट्विट' द्वारे माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:24 PM

भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकामध्ये विपरित परिणाम दिसलेले नाहीत.

ठळक मुद्देअमेरिकेनेही चाचण्या स्थगित करण्याचा घेतला निर्णय

पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित झालेल्या लसीच्या जगभरात मानवी चाचण्या सुरु आहेत. युकेमधील एका व्यक्तीमध्ये लसीच्या मानवी चाचणीनंतर विपरित परिणाम दिसून आले. त्यामुळे तेथील चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. अमेरिकेनेही चाचण्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतातील लसीच्या मानवी चाचण्या सुरुच राहतील अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी व्टिटद्वारे दिली.

अ‍ॅस्ट्रझेनेकाने युकेमधील मानवी चाचण्या थांबवल्या आहेत, याबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणतीही टिपण्णी करु शकत नाही. आतापर्यंतच्या चाचण्यांचे पुनरावलोकन करुन लवकरच सुरुवात केली जाईल, अशी अपेक्षा आहे. भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकामध्ये विपरित परिणाम दिसलेले नाहीत, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.-------------भारती आणि केईएममधील चाचण्या सुरळीतभारती हॉस्पिटलमध्ये २६ ऑगस्ट रोजी तर केईएम हॉस्पिटलमध्ये २७ ऑगस्ट रोजी कोव्हिशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली. दोन्ही ठिकाणी चाचण्यांमधील स्वयंसेवकांमध्ये कोणतेही विपरित परिणाम दिसलेले नाहीत, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. भारती हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ३४ जणांवर चाचण्या झाल्या आहे

..... 

ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ

अ‍ॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे की, चाचणीत एक नियमित व्यत्यय आलं आहे, कारण चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

या लसीला AZD 1222 असे नाव देण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.

AFPच्या वृत्तानुसार,  सध्या सुरू असलेले ट्रायल जगभर थांबविण्यात आले आहे आणि आता स्वतंत्र तपासणीनंतरच ते पुन्हा सुरू होऊ शकते. लस चाचणीच्या तिस-या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत आणि बर्‍याचदा यासाठी अनेक वर्षे लागतात. कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांचा समावेश आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मोठ्या चाचणीत आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे." ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या