शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
3
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
4
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
5
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
6
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
7
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
8
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
9
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
10
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
11
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
12
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
13
Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
14
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
15
Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष
16
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
17
अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
18
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
19
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
20
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 21:34 IST

himachal pradesh bilaspur landslide on bus: पुलावरून जात असलेल्या बसवर अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला

himachal pradesh bilaspur landslide on bus: हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. भल्लू पुलावरील एका बसवर डोंगरावरून कोसळलेल्या दरडीचा मोठा भाग पडला. या अपघातात १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अंदाजे ३० प्रवासी असल्याची माहिती आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे.

असा झाला दुर्दैवी अपघात

मंगळवारी रात्री झंडूता विधानसभा मतदारसंघातील बर्थी येथील भल्लू पुलाजवळून एक बस जात होती. त्यात सुमारे ३० प्रवासी होते. अचानक एका डोंगराला तडा गेला आणि मोठा ढिगारा बसवर पडला. प्रवाशांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावले आणि बचावकार्य सुरू केले. त्यांनीच अपघाताची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दिली.

---

जेसीबीने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू

माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी जेसीबी बोलवून बसवरील ढिगारा हटवला. त्यानंतर जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून घुमरविन झंडूता रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर उर्वरित आठ ते नऊ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसमधून तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इतरांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Himachal Pradesh: Landslide Buries Bus in Bilaspur, 15 Dead

Web Summary : A landslide in Bilaspur, Himachal Pradesh, buried a bus, killing 15. Rescue operations are underway with police and locals assisting. Approximately 30 passengers were on board the bus. Injured were taken to the hospital.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघातlandslidesभूस्खलन