शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीमध्ये मोठा धमाका! तृणमूल काँग्रेस एकट्याने लोकसभा लढणार, ममता बॅनर्जींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:27 IST

Mamata Banerjee Latest News: ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे. 

भाजपाविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक राज्यात एकट्याने लढणार असल्याचे ममता यांनी जाहीर केले आहे. आपण दिलेला जागा वाटपाचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचे ममता यांनी म्हटले आहे. 

विरोधकांची मोट बांधून मोदींना टक्कर देण्याची योजना नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी आखली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमारांचेच तळ्यात मळ्यात सुरु झाले आहे. तर काँग्रेसला मित्रपक्षांच्याही जागा हव्या आहेत. यामुळे सारा पेच फसला असून लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांवर आलेली असली तरी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने आता प्रादेशिक पक्षांनी आपापली वेगळी वाट धरण्याचा विचार सुरु केला आहे. 

यात ममता यांनी आघाडी घेतली असून तृणमुल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये एकट्याच्या ताकदीवर लढणार असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. ममता यांनी काँग्रेसला दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तर काँग्रेसने १२ जागांवर लढण्याची मागणी केली होती. यावरून आघाडी फिस्कटली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी बसपा एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांनी सपावर गंभीर आरोप केले होते.

माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये , आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसने ३०० जागांवर निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भागात भाजपशी स्पर्धा करू द्यावी, असे आम्ही आधीच सांगितले होते, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. जेणेकरून प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील, पण त्यांनी हस्तक्षेप केल्यास आघाडीचा पुन्हा विचार करावा लागेल, असेही ममता म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस