शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ब्रेकिंगः भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार ठरले; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना 'तिकीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 18:13 IST

भाजपाचे महाराष्ट्रामधील राज्यसभेचे उमेदवारही निश्चित झाले आहे. सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना भाजपाने 'या' दोन नेत्यांना 'तिकीट' दिले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नुकत्याच पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाने मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच भाजपाचे महाराष्ट्रामधील राज्यसभेचे उमेदवारही निश्चित झाले आहे. सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना भाजपाने महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआय (ए) चे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि आरपीआय आठवले गटाचे रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेले संजय काकडे आणि अमर साबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

भाजपाने महाराष्ट्राबरोबरच राज्यसभेच्या इतर राज्यातील उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांमध्ये आसाममधून भुवनेश्वर कालिता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमिलाबेन बारा, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, राजस्थानमधून राजेंद्र गहलोत यांचा समावेश आहे. त्याबरोबरच आसाममधून मित्रपक्ष बीपीएच्या बुस्वजित डाइमरी यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकRamdas Athawaleरामदास आठवलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले