गायीला मारणाऱ्याचे हातपाय तोडू - सैनी

By Admin | Updated: March 27, 2017 01:23 IST2017-03-27T01:23:03+5:302017-03-27T01:23:03+5:30

गायीला ठार मारणे किंवा तिचा अपमान करणाऱ्याचे हातपाय तोडण्याची धमकी भाजपाचे खताऔलीचे आमदार

Break the limbs of the cows - Saini | गायीला मारणाऱ्याचे हातपाय तोडू - सैनी

गायीला मारणाऱ्याचे हातपाय तोडू - सैनी

मुजफ्फरनगर : गायीला ठार मारणे किंवा तिचा अपमान करणाऱ्याचे हातपाय तोडण्याची धमकी भाजपाचे खताऔलीचे आमदार विक्रम सैनी यांनी दिली आहे. २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीत सैनी हे आरोपी असून त्यांना
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली होती.
उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश  राणा यांच्या शनिवारी येथे  झालेल्या सत्कार समारंभात  सैनी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘वंदे मातरम म्हणायला जे तयार नसतात, भारत माता की जय  म्हणताना ज्यांना वेदना होतात आणि गायीला जे आपली माता न समजता तिला ठार मारतात त्यांचे हातपाय तोडण्याचे आश्वासन मी दिले. 
होते. हे आश्वासन पूर्ण करण्यास आम्ही तयार आहोत. हे काम करण्यासाठी आमच्याकडे तरुणांचा संच तयार आहे.’’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायीच्या तस्करीवरील बंदी राबवण्याचे आणि बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना सैनी यांनी वरील इशारा दिला. कायदेशीररित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांना काहीही अडचण येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बेकायदा कत्तलखाने बंद केले जातील, असे योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये शनिवारी सत्कार समारंभात म्हटले होते.

Web Title: Break the limbs of the cows - Saini