सुरतमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण, तक्रार घेण्यास आधी टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:36 IST2017-11-11T23:36:26+5:302017-11-11T23:36:34+5:30
महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, भाजपा नगरसेवक प्रवीण कहर मात्र अटक टाळण्यासाठी फरार झाले आहेत.

सुरतमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण, तक्रार घेण्यास आधी टाळाटाळ
सूरत : महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवकाच्या तीन पुतण्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, भाजपा नगरसेवक प्रवीण कहर मात्र अटक टाळण्यासाठी फरार झाले आहेत. त्या महिलेचे आपल्या जावयाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत नगरसेवक कहर व त्यांच्या पुतण्यांनी महिलेला मारहाणही केली.
नगरसेवक कहर आपल्या पुतण्यांसह मंगळवारी त्या महिलेच्या घरात घुसले. तिथे त्यांचा जावईही होता. त्या चौघांनी मिळून महिला व जावयाला घराबाहेर खेचत आणले आणि मारहाण सुरू केली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्या दोघांना नानपुरा क्रॉसरोडला नेण्यात आले आणि तिथे पुन्हा मारहाण सुरू केली.
तेथून त्यांचा जावई पळून गेला. पण महिला त्या चौघांच्या ताब्यात राहिली. त्यांनी तिला निर्वस्त्र केले आणि मारहाण करून, नंतर ते पळून गेले. महिलेने आधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ती राहत असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
तक्रार घेण्यास आधी टाळाटाळ
घराजवळच्या पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ सुरू केल्याने तिने पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतरच पोलिसांनी नगरसेवकांच्या तिन्ही पुतण्यांना अटक केली. ते सध्या कोठडीत आहेत. नगरसेवक कहार मात्र फरार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.