शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरुणांना मारहाण करुन केलं नग्न, एकमेकांसोबत करायला लावला सेक्स; मोबाइलमध्ये केलं शूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:54 IST

राजधानी दिल्लीत 10 जणांनी मिळून दोन अल्पवयीन तरुणांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणांना आधी जबरदस्त मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात भाग पाडण्यात आलं.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत 10 जणांनी मिळून दोन अल्पवयीन तरुणांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणांना आधी जबरदस्त मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात भाग पाडण्यात आलं. यावेळी आरोपी हे सर्व आपल्या मोबाइलमध्ये शूट करत होते. पश्चिम दिल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला. अनैसर्गिक कृत्यासोबत पॉस्कोअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शनिवारी रात्री दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलिसांचे विशेष आयुक्त आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी दिपेंद्र पाठक यांनी दिली आहे. 

26 ऑक्टोबर रोजी पश्चिम दिल्ली येथील रोहिनी येथे हा प्रकार घडला होता. पण घाबरलेल्या मुलांनी भीतीपोटी या घटनेबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित मुलांचं वय 13 आणि 15 आहे. दोघेही मित्र असून आपल्या कुटुंबासोबत मेट्रो विहार परिसरात राहतात'.

आरोपींपैकी एक असणा-या कन्वर सिंह याला आपल्या घरात झालेल्या चोरीत पीडित मुलांचा समावेश असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने मुलांना धमकी देत भेटण्यासाठी बोलावलं आणि ओलीस ठेवलं. सुरुवातीला कन्वर सिंह याने चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. पण मुलांनी चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला नाही तेव्हा तो संतापला आणि आपल्या मित्रांना बोलावलं. त्यांनी पीडित मुलांना नग्न केलं आणि एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडलं. तब्बल पाच तास हा अमानुष छळ सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

'दोघा पीडित मुलांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करायला लावून, आरोपींनी मोबाइलमध्ये शूट केलं. पोलिसांकडे जाऊन घटनेची भाष्यता केल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकीच आरोपींनी दिली होती', असं पोलिसांनी सांगितलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलांच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटकेही दिलेत. दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, प्रकृती नाजूक आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळsex crimeसेक्स गुन्हाCrimeगुन्हाPoliceपोलिस