लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला प्यायला लावले अॅसिड

By Admin | Updated: March 24, 2017 13:22 IST2017-03-24T13:21:34+5:302017-03-24T13:22:04+5:30

दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मुलाच्या दारु आणि ड्रग्जच्या सवयीमुळे मुलीने लग्नास नकार दिला. पण हा नकार मुलाला पचवता आला नाही.

As the boy refused to marry, the boy used to drink a sweet acid | लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला प्यायला लावले अॅसिड

लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला प्यायला लावले अॅसिड

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 24 - लग्नाची मागणी फेटाळून लावली म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीला टॉईलेट सफाईसाठी वापरले जाणारे द्रव्य प्यायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील संगम विहारमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. आरोपी रवी कुमार 23 वर्षांचा असून मुलगी 19 वर्षांची आहे. 
 
दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.  मुलाच्या दारु आणि ड्रग्जच्या सवयीमुळे मुलीने लग्नास नकार दिला. पण हा नकार मुलाला पचवता आला नाही. रवी कुमारने मुलीला जबरदस्तीने टॉईलेट क्लीनर प्यायला लावल्यानंतर तिथून पसार झाला. पण नंतर स्वत:हून पोलिसांना शरण आला. जे टॉईलेट क्लीनर प्यायला लावले ते फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले आहे. 
 
आपल्या मुलीला अॅसिड प्यायला भाग पाडले असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. मागच्या दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. दोन्ही कुटुंबांना याची माहिती होती असे पोलिसांनी सांगितले. दोघांच्या घरी लग्नाची बोलणी देखील सुरु झाली होती. पण मुलाच्या सवयी समजल्यानंतर आमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता असे पीडित मुलीच्या बहिणीने सांगितले. टॉईलेट क्लीनर प्याल्यानंतर मुलीचे तोंड भाजले, तिला बोलता येत नव्हते. एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: As the boy refused to marry, the boy used to drink a sweet acid