शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 20:27 IST

देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज 130 ते 160 रुपये किलोने विकला जात आहे. भाज्यांच्या वाढत्या किमती पाहता वाराणसीतील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या दुकानावर चक्क बाऊन्सर(सेक्युरिटी गार्ड) लावले. या बाऊन्सर्सना खास टोमॅटोच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले. भाजीच्या दुकानात बाऊन्सर्स पाहून खरेदीला येणाऱ्या नागरिकांचीही तारांबळ उडाली. याबाबत भाजी विक्रेत्याला विचारले असता त्यानी सांगितले की, सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे लोक वाद घालतात. वाद होऊ नये म्हणून दुकानात दोन बाऊन्सर स्वतःच्या आणि टोमॅटोच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. सर्व टोमॅटो विकले जातील, तेव्हा या बाऊन्सरचे काम संपेल. 

दरम्यान, हा भाजीविक्रेता समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता असून, त्याने महागाईच्या निषेधार्थ केलेले हे अनोखे आंदोलन आहे. सपा कार्यकर्ता अजय फौजीने पीटीआयला सांगितले की, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ त्याने त्याच्या दुकानात बाऊन्सर तैनात केले आहे. त्यानी एक पोस्टरही लावले आहे, ज्यामध्ये आधी पैसे मग टोमॅटो असे लिहिले आहे. अजय फौजीने सांगितले की, काही लोक टोमॅटो खरेदी करताना वाद घालतात, टोमॅटोची लूटही करत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नकोय, त्यामुळे बाऊन्सर ठेवले आहेत. हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे.

यापूर्वीही अजय फौजी चर्चेत आलेवाराणसीमध्ये टोमॅटोच्या संरक्षणासाठी बाऊन्सर लावणारे अजय फौजी हे सपा कार्यकर्ते आहेत. टोमॅटोच्या भाववाढीविरोधात ते अनोखे आंदोलन करत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब अशाप्रकारच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील सतीश फौजी यांनी मायावतींच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास विरोध केला होता. याशिवाय अजय फौजी काळे झेंडे घेऊन पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी पोहोचले होते. पीएम मोदींच्या ताफ्याचे वाहन येताना पाहून त्यांनी उडीही मारली होती.

टॅग्स :InflationमहागाईUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा