गुप्तांगात पेट्रोल भरले दोघांची प्रकृती गंभीर

By Admin | Updated: October 20, 2016 04:45 IST2016-10-20T04:45:29+5:302016-10-20T04:45:29+5:30

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करून गुदद्वारात सीरिंजने पेट्रोल भरल्याने दोन किशोरवयीन भावांची प्रकृती गंभीर आहे.

Both of them were seriously ill | गुप्तांगात पेट्रोल भरले दोघांची प्रकृती गंभीर

गुप्तांगात पेट्रोल भरले दोघांची प्रकृती गंभीर


गाझियाबाद : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करून गुदद्वारात सीरिंजने पेट्रोल भरल्याने दोन किशोरवयीन भावांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी दिल्लीच्या गुरु तेग बहादूर इस्पितळात दाखल करण्यात आले.
ही अमानुष घटना १३ आॅक्टोबर रोजी गाझियाबाद जिल्ह्यात घडली. पोलिसाने सांगितले की, या प्रकरणी समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते हाजी एहसान कुरेशी यांचा भाऊ रिझ्वान व त्याचा साथीदार अकिल अशा दोघांना अटक करण्यात आली. नदीम नावाचा तिसरा आरोपी कोर्टात स्वत:हून हजर झाला. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Both of them were seriously ill