शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:00 IST

Vijay Rupani :अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील दिली.

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक हृदयद्रावक आणि भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान एआय १७१ काही मिनिटांतच कोसळलं. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे.

या अपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही दु:खद निधन झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील दिली असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक आणि निष्ठावान चेहरा आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनसामान्यांमधून उमटत आहे.

विजय रूपाणी- एक शांत, संयमी आणि समर्पित नेतृत्वविजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारची राजधानी रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९६० मध्ये कुटुंबासह गुजरातमधील राजकोटमध्ये स्थलांतर केलं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता.

विद्यार्थी दशेपासूनच विजय रुपाणी यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये (ABVP) सक्रिय असलेल्या रूपाणी यांनी १९७१ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि भाजपच्या स्थापनेपासूनच पक्षाशी निष्ठावान राहिले.

राजकीय वाटचाल२०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली. तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपली जागा सोडल्याने राजकोट पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, ज्यात भाजपने रुपाणी यांना उमेदवारी दिली. त्यांनी ही पोटनिवडणूक जिंकली आणि राजकोट पश्चिममधून आमदार झाले. त्यांना २०१४ मध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवले आणि परिवहन, पाणीपुरवठा, कामगार व रोजगार यांसारख्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर, ७ ऑगस्ट २०१६ रोजी गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. २०२१ पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत राहिले.

एक विचारवंत आणि स्पष्टवक्ता नेता हरपला!विजय रूपाणी हे आपल्या सौम्य आणि संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते. त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि आर्थिक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी आणि भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघाताची अधिकृत चौकशी सुरूसरकारकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, एअर इंडियाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे.

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटना