शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:32 IST

Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही.

ठळक मुद्देगेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये वाढला होता तणावभारत चीनदरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा झाली होती सकारात्मक

गेल्या वर्षी मे महिन्यापासूच भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर हा वाद सोडवण्यासाठी देशातील सैन्य आणि राजकीय स्तरावरही अनेक चर्चा पार पडल्या आहेत परंतु आता पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत आणि चीन आपलं सैन्य मागे परतत असल्याचा दावा चिनी प्रपोगंडा पसवणारं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं केला आहे. दरम्यान, चीनच्या या दाव्यावर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."भारत आणी चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार चीन आणि भारत बॉर्डर ट्रुप्सनं बुधावारी पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे," असा दावा ग्लोबल टाईम्सनं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं केला आहे.  सीमेवरील वातावरणाबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनच्या दरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या मध्ये असलेल्या सीमेच्या परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झालं होतं. भारतीय लष्करानंही ही बाब सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. तसंच संरक्षण मंत्रालयानंही यानंतर याबाबत माहिती देत नवव्या टप्प्यातील चर्चा सकारात्मक राहिल्याचं म्हटलं होतं. तसंच दोन्ही बाजूनं सैनिक हटवण्यावर सहमती झाली आहे. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसंच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. कडाक्याच्या थंडीतही सैनिकांची तैनातीसध्या लष्कराचे ५० हजारांपेक्षा अधिक सैनिक शून्य पेक्षाही कमी तापमानात देशाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चीननंही आपले सैनिक त्या ठिकाणी तैनात केले आहे. पँगाँग लेक आणि आसपासचा परिसर रणनितिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर भारतानं त्या ठिकाणी गस्त वाढवली होती. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख