तेल्हार्‍यात पुस्तकाच्या दुकानास आग

By Admin | Updated: June 6, 2014 22:02 IST2014-06-06T21:44:13+5:302014-06-06T22:02:01+5:30

वैशाली बुक्स एम्पोरियम या पुस्तकाच्या दुकानाला आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

Bookstore fire in Telhar | तेल्हार्‍यात पुस्तकाच्या दुकानास आग

तेल्हार्‍यात पुस्तकाच्या दुकानास आग

तेल्हारा : स्थानिक संत तुकाराम महाराज चौकातील वैशाली बुक्स एम्पोरियम या पुस्तकाच्या दुकानाला आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. वैशाली बुक्स एम्पोरियमला अचानक आग लागल्याने दुकानातील वह्या-पुस्तकांसह इतर शालेय साहित्य जळून खाक झाले. आजुबाजूच्या व्यावसायिकांनी व नागरिकांनी ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली. आगीचे कारण कळू शकले नाही. 

Web Title: Bookstore fire in Telhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.