नरेंद्र मोदींना 'गोल्डन ट्विट'चा किताब

By Admin | Updated: December 11, 2014 12:01 IST2014-12-11T11:34:12+5:302014-12-11T12:01:13+5:30

सोशल मीडियाचा खुबीने वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट २०१४' हा किताब मिळाला आहे. सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो.

Book of 'Golden Tweet' to Narendra Modi | नरेंद्र मोदींना 'गोल्डन ट्विट'चा किताब

नरेंद्र मोदींना 'गोल्डन ट्विट'चा किताब

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - सोशल मीडियाचा खुबीने वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट २०१४' हा किताब मिळाला आहे. सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी  'India has won! भारत की जय! अच्छे दिन आनेवाले है' असे ट्विट केले होते, जे ७० हजारांपेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आले. त्यामुळेच मोदींच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट २०१४' हा किताब मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात लाखो चाहते असून ते वेगवेगळ्या माध्यमातून मोदींशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असताता. ट्विटरवरही लाखोजण त्यांना फॉलो करत असून गेल्या वर्षभरात फॉलोअर्स वाढवण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. मोदींचे सध्या ८५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून २०१४ या वर्षात ४६ लाख ट्विटर युजर्सनी त्यांना फॉलो करणे सुरू केले.
सर्वाधिका फॉलोअर्स असणा-या व्यक्ती : 
अमिताभ बच्चन  (@srBachchan) - १ कोटी १९ लाख १६ हजार ६७०
शाहरुख खान (@iamsrk) -  १ कोटी ३ लाख २५ हजार ७६८
आमिर खान (@amir_khan)  - ९९ लाख ६१ हजार ५८८
सलमान खान (@Beingsalmankhan) - ९५ लाख ५ हजार ७३६
नरेंद्र मोदी (@narendramodi) - ८५ लाख ४९ हजार २६८
 

Web Title: Book of 'Golden Tweet' to Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.