Bombay की मुंबई वाद पुन्हा पेटणार...
By Admin | Updated: February 11, 2016 09:33 IST2016-02-10T20:38:01+5:302016-02-11T09:33:59+5:30
येथील एका ब्रिटिश वृत्तपत्राने भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा उल्लेख पुन्हा बॉम्बे असा केला आहे. दी इंडिपेंडन्ट या ब्रिटिश दैनिकाच्या संपादकीय लेखात

Bombay की मुंबई वाद पुन्हा पेटणार...
>
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १० - येथील एका ब्रिटिश वृत्तपत्राने भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा उल्लेख पुन्हा बॉम्बे असा करणार असल्याचे स्पष्ट केले. 'दि इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबईत बहुभाषिक मराठी लोकसंख्या असल्याने त्यांच्या बोलीभाषेतून मुंबई असा शहराचा उल्लेख अनेकदा येत असल्याने शिवसेना पार्टीने ब्रिटीशांनी ठेवलेल्या बॉम्बेला विरोध केला. त्यानंतर १९९५ पासून बॉम्बेचा सर्व स्तरावर बॉम्बे ऐवजी मुंबई असा उल्लेख करण्यात येऊ लागला.
मात्र बॉम्बे एक खुले केंद्रबिंदी असून सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेल्या बंदराचे शहर आहे. तसेच, जगासाठी गेट वे ऑफ इंडिया खुले आहे, असे अमोल राजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईचा उल्लेख पुन्हा 'बॉम्बे' असाच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.