ट्रंप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात दिसणार बॉलिवूडचा जलवा

By Admin | Updated: January 2, 2017 22:22 IST2017-01-02T22:22:17+5:302017-01-02T22:22:17+5:30

बॉलिवूडचे चित्रपट आणि कलाकारांनी जागतिक सिनेसृष्टीत आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे हॉलिवूडसह देशोदेशीच्या चित्रपटांमध्ये आता भारतीय कलाकार दिसू लागले आहेत.

Bollywood's flute will take place at Trump's swearing-in ceremony | ट्रंप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात दिसणार बॉलिवूडचा जलवा

ट्रंप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात दिसणार बॉलिवूडचा जलवा

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि, 2 - बॉलिवूडचे चित्रपट आणि कलाकारांनी जागतिक सिनेसृष्टीत आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे हॉलिवूडसह देशोदेशीच्या चित्रपटांमध्ये आता भारतीय कलाकार दिसू लागले आहेत. आता तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथग्रहण कार्यक्रमात  बॉलीवूडच्या कलाकारांचा जलवा दिसणार आहेत. 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक आघाडीचे कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत.
माजी मिस इंडिया मनस्वी ममगांई आणि रिपब्लिकन हिंदू कोलिशनचे भारतीय दूत शलभ कुमार यांनी याला वृत्ताला दुजोरा दिला आहे. मनस्वी हिने सांगितले की ती स्वत: या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मनस्वी ही स्वत: ट्रंप यांची समर्थक असून, ट्रंप हे भारतासाठी सर्वोत्तम अमेरिकी राष्ट्रपती ठरू शकतात असा विश्वास तिने व्यक्त केला.  
 

Web Title: Bollywood's flute will take place at Trump's swearing-in ceremony