गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाचं विरोधकांकडून समर्थन करण्यात आलं आहे. काँग्रेसनंदेखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. गुरूवारी झारखंडमधील सरायकेला-खरसावां जिल्ह्यात काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एका जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली ज्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती त्यापेक्षा वेगळ्याच कारणामुळे या रॅलीची आता चर्चा होऊ लागली आहे. या रॅलीत गर्दी जमवण्यासाठी एका डान्सरला बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या रॅलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मंचावर काही महिला आणि नेते बसलेले दिसत आहेत. त्यांच्या समोरच डान्सर लैला मै लैला या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. यादरम्यान, त्या ठिकाणी जमलेल्या काही कार्यकर्त्यांनीही या गाण्यावर ठेका धरला होता.
काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीच्या मंचावर 'लैला मै लैला'चे लागले ठुमके; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 15:38 IST
Farmers Protest : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजन
काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीच्या मंचावर 'लैला मै लैला'चे लागले ठुमके; व्हिडीओ व्हायरल
ठळक मुद्देनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजनभाजप नेत्यानं शेअर केला व्हिडीओ