शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

Heeraben Modi Death: पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनानंतर बॉलिवुडमधून शोक व्यक्त; आई कुठेच जात नाही...सोनू सूदचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

Heeraben Modi Death:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारावेळी त्यांचे निधन झाले.हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.

मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातूनही शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते अनुपम खेर, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना रणौत, अभिनेत्री शहनाझ गिल, अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'आईला गमावण्याहून दुसरे मोठे दु:ख नाही. देव तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो', अशा शब्दात अभिनेता अक्षय कुमारने शोक व्यक्त केला.

'कठीण प्रसंगी देव पंतप्रधान मोदी यांना संयम आणि शांती देवो, ओम शांती' असे पोस्ट करत कंगनाने आदरांजली वाहिली आहे.

तर अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या माता हीराबेन यांच्या निधनाची बातमी ऐकून मन व्यथित झाले आहे. तुमचे आईसाठी असलेले प्रेम आणि आदर याची कल्पना सर्वांनाच आहे. त्यांची जागा कोणीच भरु शकणार नाही. पण तुम्ही भारतमातेचे पुत्र आहात. माझ्या आईसह  प्रत्येक मातेचा तुम्हाला आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.'

काश्मीर फाईल्स दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले, भारतमातेच्या पुत्राच्या आईचे कर्मयोगी जीवन कायमच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. नमन ओम शांती'.

कॉमेडियन कपिल शर्माने लिहिले, ' आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे हे जग सोडून जाणे खूपच दु:खद आहे. त्यांचा आशिर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहे. त्यांना स्वर्गलाभ होवो ही प्रार्थना, ओम शांती.'

'आदरणीय मोदीजी आई कुठे जात नाही, आपला मुलगा दुसऱ्यांसाठी अजून चांगले कर्म करेल यासाठी ती ईश्वरचरणी जाते.  माताजी नेहमीच तुमच्यासोबत होती आणि पुढेही असेल', अशा शब्दात अभिनेता सोनू सूद यांनी शोक व्यक्त केला.

Heeraben Modi Death: हीराबेन पंचत्वात विलीन; नरेंद्र मोदींनी दिला मुखाग्नी

हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonu Soodसोनू सूदbollywoodबॉलिवूडBJPभाजपा