शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 15:22 IST

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका स्नॅक्सच्या फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला.

पटना:बिहारमधील मुझफ्फरपूर येथील स्नॅक्स फॅक्टरीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 6-7 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बेला औद्योगिक परिसरातील मोदी कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर एसपी-डीएमसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात 1 डझनहून अधिक लोक काम करत होते. मंडळ अधिकारी सुधांशू शेखर यांनी या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. जोरदार स्फोटानंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले आणि मदत-बचाव कार्य सुरू केले.

नूडल्स कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या फॅक्टरीत हा स्फोट झाला तिथे नूडल्स बनवले जात होते. या स्फोटात नूडल्सचा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या इतर अनेक कारखान्यांचेही नुकसान झाले आहे. मुझफ्फरपूरचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना सदर हॉस्पिटल आणि SKMCH मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :Blastस्फोटBiharबिहारDeathमृत्यू