शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:25 IST

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे.

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली केंद्रातील मोदी सरकारने केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या ५४ योजनांचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय, नीती आयोगाकडूनही २६० केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेणे सुरू आहे. ३१४ योजनांचा फायदा नागरिकांना किती होत आहे हे ३१ मार्च २०२६ पर्यंत समोर न आल्यास त्या पुढे चालू ठेवण्याची शिफारस केंद्र सरकार करणार नाही. यापैकी बहुतेक योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने मंजुरी घ्यावी लागेल, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ११.२१ लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे. लाभार्थ्यांची कठोर छाननी करून आणि बोगस लाभार्थींना काढून टाकल्यानंतर त्यांनी आधीच ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे ही छाननी पुढेही अशीच सुरूच राहणार आहे.

२.८९ लाख कोटी रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारचे खर्च होत आहेत.

सरकार असे वाचवतेय पैसे

सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठविणे तसेच अधिक परिणाम मिळावा यासाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यावर भर दिला आहे. यामुळे पैशांची बचत होत आहे.

केंद्राच्या प्रमुख योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी)

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान

मनरेगावर येणार मर्यादा

आश्चर्याची बाब म्हणजे, संपूर्णपणे केंद्र सरकार निधी देत असलेल्या ५४ योजनांचे मूल्यांकन संबंधित मंत्रालये आणि विभागांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘थर्ड पार्टी’कडून केले जाणार आहे. त्यामुळे लोकांकडून मागणी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनांवरही (मनरेगा) काही मर्यादा येणार आहेत.

इतर २६० केंद्र पुरस्कृत अंशतः निधी असलेल्या योजनांचे मूल्यांकन नीती आयोगातील डीईएमओद्वारे होईल. ३१ मार्च २०२६ पूर्वी योजनांचे मूल्यांकन करायचे आहे.

...तरच योजना सुरू राहणार

अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की योजनांनी त्यांचे निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यात किती यश आले हे सिद्ध करावे लागणार आहे. जर त्यांनी हे सिद्ध केले तरच त्या योजना चालू राहतील. 

प्रत्येक योजना बंद करण्याची एक तारीख असावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, एखाद्या योजनेच्या बदल्यात कमी खर्चात आणखी एक पर्यायी योजना सादर करण्याचाही पर्याय सरकारने मांडला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी