दिवाळे येथे तरुणीचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:12+5:302015-08-14T22:54:12+5:30

नवी मुंबई : दिवाळे गावाच्या खाडीकिनारी एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असून आत्महत्येची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.

The body of the woman was found in Dewale | दिवाळे येथे तरुणीचा मृतदेह आढळला

दिवाळे येथे तरुणीचा मृतदेह आढळला

ी मुंबई : दिवाळे गावाच्या खाडीकिनारी एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असून आत्महत्येची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी दिवाळे गावाच्या जे˜ीलगत खाडीमध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. याची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सुमारे २५ वर्षीय तरुणीचा हा मृतदेह असून तिने बुरखा घातला आहे. हा मृतदेह पाण्यासोबत वाहत आल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. ही तरुणी नेरूळ परिसरातील असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार या मयत तरुणीच्या कुटुंबीयांचा शोध घेवून तिची ओळख पटवण्याचे काम एनआरआय पोलीस करत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The body of the woman was found in Dewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.