बेपत्ता भारतीय गिर्यारोहकाचा मृतदेह अखेर सापडला
By Admin | Updated: April 6, 2015 08:23 IST2015-04-04T12:47:27+5:302015-04-06T08:23:19+5:30
अर्जेंटिना व चिलीदरम्यानच्या पर्वत रागांमध्ये गिर्यारोहण करताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह सापडला आहे.

बेपत्ता भारतीय गिर्यारोहकाचा मृतदेह अखेर सापडला
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - अर्जेंटिना व चिलीदरम्यानच्या पर्वत रागांमध्ये गिर्यारोहण करताना बेपत्ता झालेला भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह सापडला आहे. एका पर्वतावर चढताना तो मार्चमध्ये बेपत्ता झाला होता, तेव्हापासून त्याचे सहकारी त्याचा शोध घेत होते. त्यासाठी ' रेस्क्यू मल्ली मस्तान बाबू' या नावाने फेसबूक पेजही बनविण्यात आले होते. अखेर त्याच पेजवरून त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
मूळचा आंध्र प्रदेशमधील रहिवासी असणा-या मल्ली मस्तान बाबूने २००६ मध्ये १७२ दिवसांत ७ शिखरे पार केली होती. त्यामुळे जगातील सात शिखरे सर्वात जलद सर करणारा गिर्यारोहक अशी त्याची ओळख होती.