महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू राहत्या घरात आढळला मृतदेह

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

कल्याण : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५ वर्षीय महिला कल्याणमधील तिच्या राहत्या घरात रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मृतावस्थेत आढळली. हा प्रकार संशयास्पद असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

The bodies of the woman constables were found in the residential premises | महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू राहत्या घरात आढळला मृतदेह

महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू राहत्या घरात आढळला मृतदेह

्याण : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागात मुलुंड येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेली यास्मिन शेख ही ३५ वर्षीय महिला कल्याणमधील तिच्या राहत्या घरात रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मृतावस्थेत आढळली. हा प्रकार संशयास्पद असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
पश्चिमेतील खोजा जमाद खान सिल्व्हर जुबिली इमारतीत यास्मिन ही कुटुंबासमवेत राहायची. तिचा पती मोहदविन शेख हा रिक्षाचालक आहे.
रविवारी रात्री तो घरी आला असता पत्नी जमिनीवर निपचित पडली होती. तिला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत असल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद एमएफसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पांढरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
----------------
वाचली - नारायण जाधव

Web Title: The bodies of the woman constables were found in the residential premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.