शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

झटक्यावर झटके! हिमाचल संकटानंतर आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:38 IST

हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दिसत असतानाच, आता आणखी एका राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे...

हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दिसत असतानाच, आता ईशान्येकडील आसाममध्येही पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी यांनी पक्ष सोडला असून ते भाजपचे कमळ हाती घेऊ शकतात. जोरगाट येथील ज्येष्ठ नेते राणा गोस्वामी यांच्याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. नुकतेच आणखी एक कार्यकारी अध्यक्ष कमलाख्या डे पुरकायस्थ यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला होती. याशिवाय आमदार बसंत कुमार दास यांनीही भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांतच आसाममधील तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडडचिठ्ठी दिली आहे.

केसी वेणुगोपाल यांच्या नावे लिहिलेल्या एका पत्रात राणा गोस्वामी यांनी म्हले आहे, "मी आसाम काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. याशिवाय काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणूनही जबाबदारी सोडत आहे." त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीही भोट घेतल्याचे बोलले जाते आहे. सरमा नुकतेच दिल्लीला गेले होते. यावेळी लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, महत्वाचे म्हणजे, राणा गोस्वामी यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, यामुळेच ते भाजपमध्ये जाणार आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.

तत्पूर्वी, सरमा यांनी मंगळवारीच म्हटले होते की, राणा गोस्वामी हे जोरहाटमधील एक मजबूत नेते आहेत. जर ते आलेच तर आम्ही त्यांचे पक्षात स्वागतच करू. गोस्वामी हे दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यामुळे त्यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतही जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.

सरमा म्हणाले, केवळ मुस्लीम आमदारच शिल्लक राहतील - गत 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 126 पैकी केवळ 29 जागाच मिळाल्या होत्या. मात्र, हा नंबर काही वेळातच घटून 27 वर आला होता. या दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर झालेल्या पोट निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. याशिवाय, आणखीही काही आमदार काँग्रेस सोडून भाजप किंवा भाजपचा सहकाही पक्ष असलेल्या आसाम गण परिषदमध्ये जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी म्हटले होते की, आता काही मुस्लीम आमदारच काँग्रेसमध्ये शिल्लक राहतील.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसAssamआसामRahul Gandhiराहुल गांधी