पाटणा रेल्वे स्थानकात पॉर्न साईटस झाल्या ब्लॉक

By Admin | Updated: October 26, 2016 12:42 IST2016-10-26T11:12:34+5:302016-10-26T12:42:41+5:30

पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय वापरुन पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस रेल्वेने सोमवारी ब्लॉक केल्या.

Block blocks at porn sites at Patna railway station | पाटणा रेल्वे स्थानकात पॉर्न साईटस झाल्या ब्लॉक

पाटणा रेल्वे स्थानकात पॉर्न साईटस झाल्या ब्लॉक

ऑनलाइन लोकमत 

मुगलसराय, दि. २६ - पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय वापरुन पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस रेल्वेने सोमवारी ब्लॉक केल्या. रेल टेलने नुकत्याचा केलेल्या सर्वेक्षणात पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सुविधेचा सर्वाधिक वापर पॉर्न साईटस पाहण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. 
 
पाटणा जंक्शनमध्ये पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस बंद करण्याची प्रक्रिया रेल टेलने सुरु केली आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणा-या सर्व महत्वाच्या स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा ट्रेनची माहिती जाणून घेण्यासाठी दिली आहे. दुर्देवाने या सुविधेचा वापर दुस-या कारणांसाठी केला जात आहे असे पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ अरविंद राजक यांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
 
पाटणा जंक्शनमध्ये इंटरनेटवरुन पॉर्न साईटसवरील व्हिडीओ डाऊनलोड केले जात होते. हाजीपूर, मुघलसराय, या स्थानकातही मोफत वाय-फायची सुविधा असून तिथेही या साईटस बंद केल्या जाणार आहेत. गया रेल्वे स्थानकातही मोफत वाय-फायची सुविधा लवकरच सुरु होईल तिथे अशा कामांसाठी वाय-फायचा वापर होणार नाही याची काळजी घेऊ असे राजक यांनी सांगितले. 
 

Web Title: Block blocks at porn sites at Patna railway station