नेत्र शिबिरात पाच जणांना अंधत्व
By Admin | Updated: December 22, 2014 04:08 IST2014-12-22T04:08:19+5:302014-12-22T04:08:19+5:30
पंजाबातील गुरदासपूर येथील नेत्र शिबिरात शस्त्रक्रिया करणाऱ्या ६० लोकांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची घटना ताजी असतानाच

नेत्र शिबिरात पाच जणांना अंधत्व
धर्मशाला : पंजाबातील गुरदासपूर येथील नेत्र शिबिरात शस्त्रक्रिया करणाऱ्या ६० लोकांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची घटना ताजी असतानाच शेजारच्याच हिमाचल प्रदेशातही अशीच घटना उघडकीस आली आहे़ कांगरा जिल्ह्यातील नि:शुल्क नेत्र शिबिरात शस्त्रक्रिया करणाऱ्या पाच रुग्णांना अंधत्व आले आहे़
पठाणकोटच्या डॉक्टरने ही शस्त्रक्रिया केली होती़ यापैकी पाच रुग्ण शुक्रवारी कांगरा जिल्ह्यातील नूरपूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी आले असता, त्यांची दृष्टी गेल्याचे उघड झाले़ (वृत्तसंस्था)