लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:24 PM2021-12-23T13:24:06+5:302021-12-23T13:24:56+5:30

Blast inside Ludhiana court complex: स्फोट होताच कोर्टाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोर्टाच्या बाथरूममध्ये झाला.

Blast Inside Court Complex In Punjab's Ludhiana, 2 Dead, several injured | लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Next

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना येथील कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी स्फोट झाला. या स्फोटात काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच, हा स्फोट तिसऱ्या मजल्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटामुळे तळमजल्यावरील वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये IED स्फोट झाला आहे. यासाठी अत्यंत जड स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट होताच कोर्टाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोर्टाच्या बाथरूममध्ये झाला. कोणीतरी येऊन हा स्फोट घडवून आणल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. सध्या घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. दुपारी 12.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. सध्या बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. 


गुरुदासपूरमध्ये आढळला होता टिफिन बॉम्ब
या महिन्यात गुरुदासपूर जिल्ह्यात चार हातबॉम्ब आणि टिफिन बॉम्ब सापडले होते. याबाबत पंजाब पोलिसांनी ही माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ग्रेनेड आणि टिफिन बॉम्ब एका गोणीत लपवण्यात आले होते. सीमावर्ती जिल्ह्यातील सलेमपूर अरैयन गावातून पोलिसांनी हे जप्त केले  होते. याच्या दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी राज्यातील दीनानगरमधून मोठ्या प्रमाणात आरडीएक्स जप्त केले होते.



 

Web Title: Blast Inside Court Complex In Punjab's Ludhiana, 2 Dead, several injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.