बांग्लादेशमध्ये हिंदूंच्या धार्मिक जत्रेत स्फोट, १० जखमी
By Admin | Updated: December 5, 2015 16:53 IST2015-12-05T16:53:12+5:302015-12-05T16:53:27+5:30
उत्तर बांगलादेशमध्ये हिंदूंच्या धार्मिक जत्रेत शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात १० भाविक जखमी झाले आहेत.

बांग्लादेशमध्ये हिंदूंच्या धार्मिक जत्रेत स्फोट, १० जखमी
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ५ - उत्तर बांगलादेशमध्ये हिंदूंच्या धार्मिक जत्रेत शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात दहा भाविक जखमी झाले आहेत.
दिनाजपूर जिल्ह्यातील कांताजी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जत्रेत शनिवारी दुपारी स्फोट झाला, त्यात १० जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना दिनाजपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.