नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला धक्काही लागला नाही : रावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:38 IST2018-12-03T06:38:20+5:302018-12-03T06:38:27+5:30
नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला धक्काही लागलेला नाही, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हटले.

नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला धक्काही लागला नाही : रावत
नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला धक्काही लागलेला नाही, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हटले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आयोगाने ‘विक्रमी रक्कम’ जप्त केल्याचे ते म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकीतच २०० कोटी जप्त करण्यात आले. हा पैसा अत्यंत प्रभावी अशा स्रोतांकडून येत असल्याचे व अशा उपायांचा (नोटाबंदी) काहीही परिणाम होत नसल्याचे त्यातून दिसते.