कन्हैयाकुमारला पाटण्यात दाखविले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 01:50 IST2016-05-02T01:50:48+5:302016-05-02T01:50:48+5:30

जेएनयू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला रविवारी पाटण्यातील एका कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी

Black flag shown to Kanhaiyakumar in Patna | कन्हैयाकुमारला पाटण्यात दाखविले काळे झेंडे

कन्हैयाकुमारला पाटण्यात दाखविले काळे झेंडे

पाटणा : जेएनयू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याला रविवारी पाटण्यातील एका कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्यात आल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. त्यावेळी कन्हैयाकुमार याच्या समर्थकांनी ‘युथ स्वराज’ या फारशा परिचित नसलेल्या संघटनेच्या दोघांना मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या दोघांची चौकशी केली जात आहे.एस.के. ममोरियल येथे आयोजित ‘आझादी’ या कार्यक्रमात कन्हैयाकुमार भाषण देत असताना या दोघांनी ‘भारत माता की जय’ असा नारा दिला.
त्यावेळी कन्हैयाकुमार समर्थकांनी या दोघांना सभागृहातच मारहाण केली. ते रा.स्व. संघाचे सदस्य असल्याची माहिती मिळाली असून त्यांची नावेही कळली असल्याचे पाटण्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले.(वृत्तसंस्था)

Web Title: Black flag shown to Kanhaiyakumar in Patna