शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांवरही आता काळ्या म्हशींचा हल्ला जमिनीला भेगा पडल्याचा परिणाम

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.

अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस संबोधण्यात येते. पश्चिम विदर्भात ही कीड २ ते ३ वर्षांपासून हरभरा पिकांवर आढळून येत होती. मात्र, यावर्षी प्रथमच ही कीड खरीप पिकांवर दिसून येत आहे.
गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पिकांची मुळे उघडी पडली असून, त्यावर किडींनी हल्ला चढविला आहे. आधीच पावसाअभावी कोमेजले असलेल्या पिकांची अवस्था या किडींमुळे भयंकर झाली असून, शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे व भारी पावसाची वारंवारिता अत्यंत कमी असल्यामुळे जमिनीतील किडी फोफावण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. जमिनीतील किडींमध्ये सर्वसाधारण वाणी, जमिनीवरचे नाकतोडे, क्रिक्रेट, गोनोसेफॅलम भुंगा यांचा समावेश होतो. गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याला ग्रामीण भागात काळी म्हैस म्हणून ओळखतात. ही जमिनीत सक्रिय असलेली कीड असून, मुख्यत: पिकांच्या अवशेषांवर जगते. मात्र, खाद्याची कमतरता जाणवल्यावर भुंगे व अळ्या भुईमूग, हरभरा, सोयाबीन, कापूस, सुर्यफूल, ज्वारी, मूग, मका आदी पिकांवर हल्ला करतात. ही किडी बहुभक्षी असून, जमिनीत पेरलेले बियाणे व रोपटे यांच्यावर हल्ला करतात. तणयुक्त पडीक जमीन, ज्वारीसह गवतवर्गीय तणे यावर ही कीड जगते. पेरणीनंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे जमिनीला भेगा पडायला सुरुवात होते. त्यामुळे नुकतेच उगवलेल्या रोपांची मुळे उघडे पडतात. या परिस्थितीत पिकांना या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जोरदार पाऊस झाल्यास ही कीड जमिनीत दबून नष्ट होते.

----------- बॉक्स ------------
..... असे करा व्यवस्थापन
पेरलेल्या ओळीवर वजन देऊन माती झाकावी म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
कुजत असलेले सेंद्रिय पदार्थ विशेषत: पूर्वीच्या पिकांचे अवशेष किंवा गाई, म्हशी व शेळ्यांचे मल, जमिनीची पूर्व मशागत ज्याद्वारे जमिनीत पिकाचे अवशेष राहतात, अशा बाबी या किडीच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे पिकांचे संेद्रिय पदार्थांचे ढीग शेतात लावून ठेवू नये व हंगामापूर्वी त्याची विल्हेवाट लावावी.

फोटो : 07 सीटीसीएल 27