Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:18 IST2018-04-05T07:17:07+5:302018-04-05T07:18:37+5:30
काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याची जोधपूर कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे.

Blackbuck poaching verdict: जोधपूर कोर्टात आज खटल्याची अंतिम सुनावणी, सलमानसह पाच सेलिब्रेटींचा फैसला
जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याची जोधपूर कोर्टात आज अंतिम सुनावणी होणार आहे. अभिनेता सलमान खानसह इतर कलाकारांबाबत जोधपूर कोर्टा आज अंतिम निकाल देणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सलमानसह इतर कलाकारही जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. जोधपूर कोर्टा आता नेमका काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आह.
19 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान याच्यावर करण्यात आला आहे. त्यावेळी सलमानसोबत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफअली खान उपस्थित होते. त्यामुळे या कलाकारांवर सुद्धा आरोप लावण्यात आले आहेत.
सलमान खानसह सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.