शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 15:35 IST

यूपीए आणि एनडीए सरकारच्या योजनांची तुलना

नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या #10 YearChallange ची जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनेक जण त्यांचा 10 वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो शेअर करत आहेत. 10 वर्षात आपल्यात नेमका काय बदल झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सरकारनं #5YearChallange सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपानं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पाच वर्षांपूर्वीच्या आणि सध्याच्या योजनांची तुलना केली आहे. यूपीए काळातील योजनांची स्थिती आणि त्याच योजनांची सद्यस्थिती यामधून दाखवण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले पायाभूत प्रकल्प मोदी सरकारनं पूर्ण केल्याचा दावा यातून करण्यात आला आहे. भाजपाचे आणि अनेक मंत्री आणि नेत्यांनी सोशल मीडियावर हा मोहिमेचं समर्थन केलं आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली 2014 पासून देशात अनेक शानदार बदल केल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. #5YearChallange च्या माध्यमातून वीज, गॅस जोडणी, स्वच्छता, बँक खाती, खतांची किंमत, रस्तेबांधणी, थेट परकीय गुंतवणूक, लष्कराशी संबंधित प्रकल्प यांच्या संदर्भातील आकडेवारी दाखवण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. गॅस जोडणीसंदर्भात भाजपानं ट्विटरवर कार्टूनच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 2013 मध्ये लोकांना एलपीजी सिलिंडर मिळणं अवघड होतं. मात्र आता सिलिंडरची डिलेव्हरी थेट घरापर्यंत होते. याच प्रकारे आणखी एका कार्टूनमधून 2013 मध्ये समोर आलेले यूपीए सरकारचे घोटाळे दाखवण्यात आले आहेत. काँग्रेसच्या काळात फक्त घोटाळे झाले. तर भाजपाच्या काळात देशाचा विकास झाला, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. #5YearChallange मधून भाजपानं स्वस्त घरांच्या योजनेवरुनही यूपीए सरकारला लक्ष्य केलं. याशिवाय आधीच्या सरकारमधील आरोग्य योजना आणि भाजपाच्या आरोग्य सुविधांचीही तुलना करण्यात आली आहे.#5YearChallange मध्ये देशातील सर्वात लांब पुलाचादेखील (बोगीबील) उल्लेख आहे. यालरही कार्टूनच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा