शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादाच्या चर्चेत भाजपाची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:48 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन केला असल्याचा दावा शनिवारी केला. आतापर्यंत जे लोक भारताविरुद्ध नारेबाजी करीत होते ते ‘भारत माता की जय’ म्हणत नसले तरी ‘जय हिंद’ ही घोषणा देण्यास बाध्य झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.हा मुद्दा अधिक तापविताना जेटली यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही लक्ष्य साधले. ते म्हणाले, काही लोक लाखो करोडो देशवासीयांचे प्रेरणास्थान ठरलेल्या सावरकरांच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. एवढेच नाहीतर देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादानंतर तेथील दौरा केला होता. हे आमच्यापुढील फार मोठे वैचारिक आव्हान आहे. आम्ही हा एक सैद्धांतिक संघर्ष मानला पाहिजे, असे मत मांडताना जेटली यांनी सांगितले की, देशाविरुद्ध नारेबाजी करणारे लोक आता किमान जय हिंद म्हणण्यास तयार झाले आहेत आणि हा आमचा पहिला विजय आहे. भाजपाची विचारसरणी राष्ट्रवादाने प्रेरित आहे. परंतु आज देश तोडण्याची भाषा करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले जात असून ही फारच विचित्र परिस्थिती आहे. कायदा अथवा राज्यघटनेत कुठेही याची परवानगी नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे देशाच्या राजधानीत हे सर्व घडत आहे. जेटली दिल्ली भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करीत होते. (वृत्तसंस्था)पक्ष कार्यकर्त्यांना अनुसूचित जाती जनजातीचे लोक आणि महिलांमध्ये जाण्याचे आवाहन करताना जेटली यांनी सांगितले की, सरकार येत्या काही दिवसातच स्टँडअप इंडिया योजना सुरू करणार आहे. याअंतर्गत बँकेच्या प्रत्येक शाखेतून अनुसूचित जाती जनजाती आणि महिलांना मोठे उपक्रम आणि उद्योग सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यत कर्ज दिले जाईल.