शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
5
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
6
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
7
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
8
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
9
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
10
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
11
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
12
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
13
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
14
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
15
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
16
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
17
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
18
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
19
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
20
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:49 IST

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, पण फक्त १८ मंत्र्‍यांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप कोट्यातील सम्राट चौधरी आता नितीश कुमार सरकारमध्ये गृहमंत्रीपद सांभाळणार आहेत. २० वर्षांत पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवलेले नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिहार सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. नवीन मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृह खाते उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 

कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान

२० वर्षांत नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच गृहखाते सोडले आहे. याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते रामकृपाल यादव यांना कृषीखाते देण्यात आले आहे, ते सरकारच्या महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक मानले जातात. गुरुवारी नितीश कुमार मंत्रिमंडळात एकूण २४ मंत्र्यांनी शपथ घेतली, पण केवळ १८ जणांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. उर्वरित मंत्र्यांचे खाते अद्याप निश्चित झालेले नाही, या विषयावर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे.

कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले?

उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना जमीन आणि महसूल विभागासह खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग मिळाले. 

मंगल पांडे यांना आरोग्य आणि कायदा विभाग मिळाले. 

दिलीप जयस्वाल यांना उद्योग मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. 

नितीन नवीन यांना जमीन आणि महसूल विभागासह नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली.

रामकृपाल यादव यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती 

संजय वाघ यांची कामगार संसाधन मंत्री म्हणून नियुक्ती 

अरुण शंकर प्रसाद यांना पर्यटन विभाग तसेच कला, संस्कृती आणि युवा विभाग 

सुरेंद्र मेहता यांना प्राणी आणि मत्स्यव्यवसाय संसाधन विभाग

 नारायण प्रसाद यांना आपत्ती व्यवस्थापन विभाग 

रामा निषाद यांना मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय कल्याण विभाग 

लखेंद्र पासवान यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विभाग 

श्रेयसी सिंह यांना माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच क्रीडा विभाग 

प्रमोद चंद्रवंशी यांना सहकार आणि पर्यावरण वन हवामान बदल विभाग एलजेपीआर कोट्यात साखर उद्योग विभाग आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग 

एचएएम कोट्यात लघु जलसंपदा विभाग 

संतोष सुमन यांच्या खात्यात बदल झालेला नाही, ते पुन्हा लघु जलसंपदा विभागाचे मंत्री असतील 

दीपक प्रकाश पंचायती राज विभागाचे मंत्री असतील 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: BJP's move, Nitish Kumar gets CM post, Home to BJP.

Web Summary : In Bihar, Nitish Kumar retained CM but BJP secured the Home Ministry after 20 years. Key portfolios were allocated, with BJP's Ramkripal Yadav heading Agriculture. Cabinet distribution is ongoing, sparking political discussion.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५