शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सपा-बसपाला रोखण्यासाठी भाजपाने आखला प्लान-B 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:19 IST

उत्तर प्रदेशात भाजपाला रोखण्यासाठी सपा आणि बसपा हे राज्यातील दोन मातब्बर पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, उत्तर प्रदेशात घडत बिघडत असलेल्या राजकीय समीकरणांवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बारीक नजर असून...

लखनौ -  उत्तर प्रदेशात भाजपाला रोखण्यासाठी सपा आणि बसपा हे राज्यातील दोन मातब्बर पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, उत्तर प्रदेशात घडत बिघडत असलेल्या राजकीय समीकरणांवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बारीक नजर असून, सपा-बसपाचे आव्हान आणि विद्यमान खासदारांविरोधात असलेल्या नाराजीचा सामना करण्यासाठी भाजपाने प्लान बी आखला आहे. त्यानुसार लोकसभेच्या पुढील निवडणुकीत भाजपा उत्तर प्रदेशमधील आपल्या मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीसाठी सपा आणि बसपामधील आघाडीची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण अशा आघाडीची शक्यता गृहित धरून भाजपाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सपा आणि बसपा एकत्र येऊ नयेत, यासाठी भाजपा प्रयत्नळील आहे. मात्र तरीही सपा आणि बसपा एकत्र आलेच तर त्यांचा सामना करण्यासासाठी भाजपाने स्वत:ला तयार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या 71 उमेदवारांपैकी 50 टक्के उमेदवारांना यावेळी संधी देण्यात येणार नाही, अशा परिस्थितीत निवडणून येऊ शकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल जेणेकरून राज्यातील जागांचे गणित बिघडणार नाही, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.  मिळत असलेल्या माहितीनुसार ज्यांची आपापल्या मतदारसंघांमध्ये पकड आहे अशा प्रभावी मंत्र्यांची यादी भाजपाकडून तयार करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री सतीश महाना, एस.पी. शाही, दारा सिंह चौहान, एसपीएस बाघेल आणि विधानसभा सभापती हृदय नारायण दीक्षित यांची नावे लोकसभा उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत.  विकास आणि भावनात्मक मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेश