शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक कॉल अन् 'ऑपरेशन लोटस' फ्लॉप; भाजपाला जोरदार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:44 IST

madhya pradesh operation lotus मध्य प्रदेशातलं सरकार पाडण्याची योजना अपयशी

ठळक मुद्देभाजपाचं ऑपरेशन लोटस अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा दावाकाँग्रेस आघाडीतले सहा आमदारा दिल्लीहून परतलेएका फोन कॉलमुळे ऑपरेशन लोटस फेल

भोपाळ: मध्य प्रदेशातभाजपाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीआधीच काँग्रेस सरकार पाडण्याची योजना फसली आहे. कमलनाथ सरकारवर नाराज असलेले सहा आमदार माघारी परतले आहेत. तर ४ आमदार अजूनही बेपत्ता आहेत. राज्यातलं सरकार सुरक्षित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजपाचं ऑपरेशन लोटस एका आमदाराच्या गनमॅनमुळे फसलं आहे. सर्व काही योजनेनुसार सुरू असताना गनमॅननं केलेल्या एका फोनमुळे ऑपरेशन लोटस अपयशी ठरलं. काँग्रेस आघाडीतल्या काही नाराज आमदारांना मंगळवारी रात्री चार्टर्ड विमानानं दिल्लीला नेण्यात आलं. आमदार दिल्लीला रवाना होत असताना एका गनमॅननं फोन केला. याच कॉलमुळे आमदार दिल्लीत एकत्र थांबणार असल्याची माहिती फुटली. त्यामुळे काँग्रेसला बराच अवधी मिळाला. यानंतर काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह तातडीनं दिल्लीला रवाना झाले. राज्य सरकारला पाठिंबा देणारे काँग्रेस आघाडीतले १२ आमदार मंगळवारी दिल्लीत पोहोचणं अपेक्षित होतं. यापैकी १० आमदार दिल्लीत पोहोचलेदेखील होते. काँग्रेस आघाडीतले आमदार बुधवारी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार होते. १० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांचं सरकार कोसळेल, अशी योजना होती. दिल्लीत दोन, तर बंगळुरुत एका ठिकाणी या आमदारांना थांबवण्यात येणार होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्याकडे आमदारांच्या बंगळुरू मुक्कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुगावा लागताच काँग्रेसनं त्यांच्या ११४ आमदारांना व्हिप बजावला. कोणत्याही आमदारानं पक्षाचा व्हिप अमान्य केल्यास त्याचं विधानसभेतलं सदस्यत्व रद्द होईल, असं संसदीय कार्यमंत्री गोविंद सिंह यांनी व्हिप जारी करताना म्हटलं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याची किंमत संबंधित आमदाराला चुकवावी लागेल, असा इशाराच सिंह यांनी दिला होता.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस