'माझ्या मतदारसंघात भाजपचे ऑपरेशन कमळ'; नवीन मतदारांवरुन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:50 IST2024-12-29T13:47:53+5:302024-12-29T13:50:06+5:30

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांआधी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

'BJP's Operation Kamal in my constituency Arvind Kejriwal's big claim on new voters | 'माझ्या मतदारसंघात भाजपचे ऑपरेशन कमळ'; नवीन मतदारांवरुन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

'माझ्या मतदारसंघात भाजपचे ऑपरेशन कमळ'; नवीन मतदारांवरुन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

दिल्लीत काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात भाजपाने १५ डिसेंबरपासून ऑपरेशन लोट्स सुरू केल्याचा दावा केला आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात - त्यांचे 'ऑपरेशन लोटस' १५ डिसेंबरपासून सुरू आहे. या १५ दिवसांत त्यांनी सुमारे ५,००० मते हटवण्यासाठी आणि ७,५०० मते जोडण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत, असा  दावा केला. 

"...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

केजरीवाल म्हणाले, नवी दिल्लीत १ लाख ६ हजार मते आहेत. १ लाख ६ हजार मतांपैकी ५ टक्के मते डिलीट होत असतील आणि साडेसात हजार मते जोडली जात असतील, तर निवडणुका घेण्याची काय गरज आहे. ही उघड गुंडगिरी आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

भाजपा विद्यमान मतदारांची नावे हटवत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. नवी दिल्ली विधानसभेच्या जागेसाठी २९ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालावधीत ९०० मते कमी करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. १५ डिसेंबरपासून आजपर्यंत १९ डिसेंबरला एका दिवसात ५००० मते हटवण्यासाठी आली. सीएम अरविंद केजरीवाल म्हणाले, कोण आहेत मतं कापण्यासाठी अर्ज करणारे आणि कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत?, असा सवालही त्यांनी केला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयोग दोन महिने घरोघरी जाऊन मते मिळवत असताना १५ दिवसांत १० हजार मतदार आले कुठून, कोणाची मते मोजली जात आहेत. भाजप बाहेरून लोक आणत आहे, त्यांची बनावट मते बनवली जात आहेत.

'तुमच्यावरील दबाव वाढेल, पण कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी विचार करा, आज नाही उद्या सरकार बदलेल, पण तुमच्या नियंत्रणाखाली काहीही बदल होणार नाही. कोणाच्या सांगण्यावरुन,तुम्ही हे करत आहात. शेवटी तुम्ही पकडले जाणार आहात, असंही ते म्हणाले.

Web Title: 'BJP's Operation Kamal in my constituency Arvind Kejriwal's big claim on new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.