शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

BJP RajyaSabha MP: भाजपचा विरोधकांना धक्का; राज्यसभेच्या चार जागांवर विजय, खासदारांचा आकडा 100च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:29 IST

पहिल्यांदाच काँग्रेसनंतर अन्य पक्षाचे राज्यसभेत 100 पेक्षा जास्त झाले खासदार आहेत.

नवी दिल्ली: पहिल्यांदाच भाजपच्या राज्यसभेत 100 पेक्षा जास्त जागा झाल्या आहेत. अशी ही कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीची फेरी पाड पडली. यानंतर राज्यसभेत भाजपच्या खासदारांचा आकडा 101 झाला आहे.

भाजपने इतक्या जागा जिंकल्या13 पैकी 4 जागांवर विजय मिळवत भाजपने हा पराक्रम गाजवला आहे. भाजपचा सहयोगी युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने असाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली. असाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमधून भाजपने राज्यसभेच्या चार जागा जिंकल्या. या भागातून भाजपने राज्यसभेतील सदस्यांची संख्याही वाढवली आहे.

असामच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, "असामने एनडीएच्या दोन उमेदवारांना राज्यसभेवर निवडून पंतप्रधानांवरील विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे पवित्रा मार्गेरिटा 11 मतांनी तर UPPL च्या रावंगवरा नरझारी 9 मतांनी विजयी झाले. विजेत्यांना माझे अभिनंदन.''

भाजपची राज्यसभेत शंभरी पार राज्यसभेत भाजपने 100चा आकडा पार केल्याने, या वर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर फेकले गेले आहेत. आसाममधील राज्यसभेच्या दोन आणि त्रिपुरातील एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. नागालँडमधील एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजप उमेदवार आणि त्यांच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष एस फांगनॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली.

'आप'चा 5 जागांवर विजय

असाममध्ये काँग्रेसचे रिपुन बोरा आणि राज्यसभेतील राणी नारा यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या विजयानंतर 'आप'ने राज्यातील पाचही जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत 'आप'च्या जागांची संख्या 8 झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या टप्प्यात काँग्रेसचे संख्याबळ पाच जागांपेक्षा कमी झाले आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाAssamआसामAAPआप