शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या 'या' खासदाराने बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 19:19 IST

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपच्या निलंबित आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने टीकेची झोड उडाली आहे.

ठळक मुद्देया खासदाराचे नाव साक्षी महाराज असं आहे. साक्षी महाराज यांनी केलेले हे ट्विट वायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आले आहे.एकीकडे साक्षी  महाराज यांनी बलात्कार पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. तर दुसरीकडे बलात्कारातील आरोपीला त्यांनी सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश येथील उन्नाव जिल्ह्यात सामूहिक बलात्कारातील पीडितेला जाळून मारल्याने एकाच खळबळ माजली आहे. संपूर्ण देश या घटनेने ढवळून निघाला असताना भाजपच्या खासदाराने ट्विटरवर उन्नावमधील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपच्या निलंबित आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने टीकेची झोड उडाली आहे. या खासदाराचे नाव साक्षी महाराज असं आहे. साक्षी महाराज यांनी केलेले हे ट्विट वायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आले आहे.उन्नाव मतदारसंघातून जिंकून आलेले भाजपचे खासदार आणि वाचाळ नेते साक्षी महाराज यांनी आज उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांना भेटले. त्यानंतर त्यांनी  मी माझ्या पक्षासह पीडितेच्या कुटूंबासोबत आहे. मी संसदेतही याबद्दल बोललो होतो. दोषींना अटक केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही असे प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केले. एकीकडे साक्षी  महाराज यांनी बलात्कार पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. तर दुसरीकडे बलात्कारातील आरोपीला त्यांनी सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे साक्षी महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, अशी माहिती एनडीटीव्हीच्या न्यूज वेबपोर्टलवर देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी बांगरमऊचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली होती. 

साक्षी महाराजांच्या ट्विटवर टीका करत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी 'लोकतंत्र के सबसे बड़े मंदिर में बैठने वाले सांसद ही जब बलात्कारियों का गुणगान करें, विजयी भव और लम्बी आयु की कामना करेंगे तो क्या ऐसे लोग बलात्कार के खिलाफ कानून बनाएंगे? ये हैं BJP से उन्नाव के सांसद साक्षी महाराज जो #unnaokibeti के बलात्कारी कुलदीप सेंगर को दुआ दे रहे है!' असे ट्विट केले. तसेच कुमार विश्वास यांनी ट्विट करत 'क्यूं नहीं मिलता #unnaokibeti को न्याय? 90 बलात्कार केस, निराला-चंद्रशेखर आज़ाद के उन्नाव में? आप सबकी उबल रही जिज्ञासा का शमन शायद वहां के सांसद जी के इस बधाई संदेश से हो जाए. पढ़िए और नेताओं-पार्टियों-जातियों के बंधक बनकर कुतर्क करिए! कुछ नहीं हो सकता हम सब का.' साक्षी महाराज यांच्या ट्विटवर खेद व्यक्त केला. 

टॅग्स :Rapeबलात्कारTwitterट्विटरKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरSakshi Maharajसाक्षी महाराजUttar Pradeshउत्तर प्रदेश