गुरुदास कामतांच्या घराबाहेर भाजपाचे आंदोलन

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

स्मृती इराणींबाबतचे वक्तव्य : कार्यकर्त्यांचा गोंधळ अनाकलीय असल्याची कामतांची टीका

BJP's movement outside Gurudas Kamat's house | गुरुदास कामतांच्या घराबाहेर भाजपाचे आंदोलन

गुरुदास कामतांच्या घराबाहेर भाजपाचे आंदोलन

मृती इराणींबाबतचे वक्तव्य : कार्यकर्त्यांचा गोंधळ अनाकलीय असल्याची कामतांची टीका
मुंबई : काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक टिप्पणी विरोधात रविवारी मुंबई भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तर, कामत परिवार घरात नसताना भाजपा कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ अनाकलनीय असल्याची टीका गुरुदास कामत यांनी केली आहे.
मुंबई भाजपा महिला मोर्च्याच्या अध्यक्षा शलाका साळवी, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली दुपारी कामत यांच्या चेंबूर येथील घराबाहेर निदशर्ने करण्यात आली. घोषणाबाजी करणार्‍या निदर्शकांनी त्यांच्या घराच्या नेमप्लेटला काळे फासून निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
तर, भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घराबाहेर घातलेल्या तमाशाला आपण भीक घालणार नाही. कामत परिवार घरात नसताना भाजपा कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ अनाकलनीय असल्याची टीका गुरुदास कामत यांनी केली आहे.
कोणतीही पात्रता नसताना मनुष्यबळ विकासासारखे महत्वाचे खाते स्मृती इराणी यांना देण्यात आले. स्मृती इराणींवरील टिप्पणीने व्यथित झालेले भाजपा कार्यकर्ते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील टीकेबद्दल मौन बाळगून आहेत, असे कामत यांनी म्हटले आहे.

Web Title: BJP's movement outside Gurudas Kamat's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.