शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:17 IST

तामिळनाडूच्या वायव्येला व कर्नाटकलगत असलेल्या कोंगू प्रांतात हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वीपासूनच समर्थन मिळत आले आहे.

- असिफ कुरणे

चेन्नई : लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ चा नारा दिलेल्या भाजपने दक्षिणेतही लक्ष घातले आहे. तामिळनाडूमध्ये यंदा किमान पाच जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प आहे. त्यासाठी पक्षाने कोंगू मंडलम प्रांतात जोर लावला आहे. अण्णा द्रमुकचा हा बालेकिल्ला आहे. २०२१ च्या विधानसभेला भाजपने येथूनच दोन जागा जिंकल्या. पीएमकेचा एनडीएत समावेश झाल्याने येथे भाजपला लाभ होण्याची आशा आहे.

तामिळनाडूच्या वायव्येला व कर्नाटकलगत असलेल्या कोंगू प्रांतात हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वीपासूनच समर्थन मिळत आले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूर, सेलम येथून प्रचारास प्रारंभ केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात द्रमुकची लाट असतानादेखील कोंगू प्रांताने अण्णा द्रमुकला साथ दिली होती. त्यावेळी ३० पेक्षा अधिक जागा अण्णा द्रमुकने जिंकल्या होत्या. 

२०१९ मध्ये कोणाला किती मते? एकूण जागा    ३८ द्रमुक    २३ काँग्रेस    ८सीपीआय    २सीपीआय (एम)    २ आयएमएल    १अन्य    २

तिरंगी लढतीत लॉटरीची संधीसत्ताधारी द्रमुक, विरोधी अण्णा द्रमुक आणि एनडीए अशा तिरंगी लढतीत कोंगू प्रांतातील काही जागांवर भाजपला विजय मिळू शकतो, असा अंदाज सर्वेक्षणांमध्ये व्यक्त करण्यात आला.पीएमके दहा जागा लढविणार असून त्यातील काही जागा या कोंगू प्रांतातील असतील. पीएमके व भाजप हे आपली ताकद कोंगू प्रांतात लावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा