शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आयातीत आमदारांवर भाजपची मदार, काँग्रेसचे दोन आमदार फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 06:45 IST

जिल्ह्यात जुनागड शहरासह ग्रामीणमधील विसावदर, मानावदर, मांगरोल व केशोद असे पाच मतदारसंघ येतात. गेल्यावेळी केशोदची एक जागा सोडली

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कजुनागड :  गुजरातमध्ये मोदी लाट असतानाही जुनागड जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा काँग्रेसने जिंकत पकड घट्ट केली होती. मात्र, यापैकी दोन आमदारांना भाजपने आपल्या तंबूत खेचत उमेदवारीही दिली. काँग्रेसमधील आयातीत आमदारांच्या भरवशावर भाजप सत्तेचा मार्ग सुकर करू पाहत आहे.  

जिल्ह्यात जुनागड शहरासह ग्रामीणमधील विसावदर, मानावदर, मांगरोल व केशोद असे पाच मतदारसंघ येतात. गेल्यावेळी केशोदची एक जागा सोडली तर काँग्रेसने उर्वरित चारही जागा जिंकल्या. भाजपला पकड मिळविणे कठीण होते. त्यामुळे मानावदरचे काँगेस आमदार जवाहर चावडा यांचा २०१९ मध्ये, तर मांगरोलचे काँग्रेस आमदार बाबूभाई वाझा यांचा नुकताच भाजपप्रवेश करून घेण्यात आला. दोन्ही आयातीत आमदारांना भाजपने तिकीट दिले. जुनागडमध्ये काँग्रेसचे आमदार भिखाभाई जोशी पुन्हा रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी ब्राम्हण समाज एकवटला आहे. भाजपने संजय कोरडिया या पाटीदार समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिली असल्याने पाटीदारही एकत्र येत आहेत. पाटीदार मतांवर संपूर्ण गणित अवलंबून आहे.

विसावदरमध्ये पाटीदारांमध्ये कुस्तीयेथे ६५ टक्के मतदार पाटीदार समाजाचे आहेत. गेल्यावेळी काँग्रेसचे हर्षदभाई रिबडिया २२ हजारांनी जिंकले; पण निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसने मोठे जमीनदार शेतकरी असलेले करसन वाडदरिया, तर ‘आप’ने भूपतभाई भुयानी यांना संधी दिली आहे.

मानावदरमध्ये ‘नातीवादी’ समीकरणn२०१७ मध्ये काँग्रेसकडून जिंकलेले जवाहरभाई चावडा हे भाजपमध्ये गेले व पोटनिवडणुकीत विजयीही झाले. तेच पुन्हा रिंगणात आहेत.n काँग्रेसने कडवा पाटीदार समाजाचे अरविंद डानी यांना संधी दिली आहे. ‘आप’नेही अहीर समाजाचे करसन भादरका यांना पुढे केले आहे. n २०१९ मध्ये भाजपचे चावडा यांच्या विरोधात हरलेले काँग्रेसचे रिनुभाई फलदू हे देखील भाजपमध्ये गेले आहेत. चावडा हे नातीवादी समीकरणात माहीर मानले जातात.  या समीकरणामुळे भाजप बाजी मारू शकते.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेसBJPभाजपा